भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्षपदी कुणाल पाटील यांची नियुक्ती
पाचोरा (झूम मराठी)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भडगाव युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी कुणाल भिका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाचोरा भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी आयोजित पदाधिकांच्या आढावा बैठकीत सदरची नियुक्ती करण्यात आली.

पाचोरा – भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या आदेशानुसार भडगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक तालुका अध्यक्षपदी कुणाल भिका पाटील यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली. सदरची नियुक्ती मा. आ. दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी आज आयोजित पदाधिकांच्या आढावा बैठकी दरम्यान करण्यात आली. कुणाल पाटील यांना पक्ष एकनिष्ठतेबाबत, तालुक्यात युवकांची फळी मजबुत करण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार घरा घरात पोहचविण्याची जबाबदारी देत आजच्या काळात देश्याविषयी जागृती करुन देश आबादीत राहाण्यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजे!असे उदगार दिलीप वाघ व रा. काॅं. युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी मा. नगरसेवक तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, भडगाव तालुका अध्यक्ष राहुल पाटील, रा. काॅं. मागासवर्गीय सेलचे भडगाव तालुका अध्यक्ष अरुण सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष हर्षल पाटील, युवक प्रवक्ते भुषण पाटील, व्ही. एस. पाटील, भुषण सोनवणे, जगदिश पाटील, प्रदिप पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष तथा मा. नगरसेवक विकास पाटील, अजहर खान, रणजीत पाटील, पी. डी. भोसले, शशि चंदिले, गोपी पाटील सह पाचोरा – भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विकास पाटील यांनी केले. तर आपल्या प्रास्ताविकातुन युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी उपस्थितांना पक्ष संघटन व आगामी निवडणुकीच्या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.



