आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका अखेर स्थगित!

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुका स्थगित

ZOOM MARATHI NEWS WEB MEDIA 

By Dileep Jay Pardeshi 

धुळे : कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे. त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर हा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला होता. नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही सर्व लोकप्रतिनिधींनी निवडणुका रद्द झाल्या पाहिजेत अशी मागणी केली होती. या बाबत सुप्रीम कोर्टातही याचिका करण्यात आली होती परंतु कोर्टाने हा निर्णय आयोगाने घ्यावा असं सूचित केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांशी बोलु आणि पत्र लिहून अशी घोषणा देखील विधिमंडळात केली होती.

मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे