गुन्हेगारी

या चोराचा बिझनेस माईंड पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

नाशिकमधून चोरी केलेल्या रिक्षा मालेगावी द्यायचा भाडेतत्वावर, कमवायचा बक्कळ पैसा

झूम मराठी वृत्त

नाशिक | प्रतिनिधी, भद्रकाली पोलिसांनी नाशिक शहरात रिक्षा चोरी करणाऱ्या एकास सापळा रचून अटक केल्याची माहिती सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळ चौक येथे अन्सार अब्बास शेख ( ४८,रा. खडकाळी भद्रकाली नाशिक ) यांनी ( दि. १७ ) त्यांची रिक्षा लावली होती.

त्याठिकाणाहून अज्ञात व्यक्तीने त्यांची रिक्षा लंपास केल्याप्रकणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून भद्रकाली पोलीस ठाण्याचे वपोनी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, सपोनी ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार युवराज पाटील, लक्ष्मण ठेपणे, रमेश कोळी, विशाल काठे, संदीप शेळके, गणेश निंबाळकर, सागर निकुंभ, उत्तम खरपडे यांच्या पथकाने परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली.

यावरून एका अज्ञात व्यक्तीचे वर्णन प्राप्त झाले. सदर वर्णनाच्या व्यक्तीचा तपास केला असता तो बाहेरील असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. सीसीटिव्ही फुटेज (CCTV footage) मधील वर्णनाचा एक व्यक्ती खडकाळी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावरून त्यांनी राजेंद्र मधुकर हिरे ( ४०,रा. सोयगाव,सातमाऊली मंदिराजवळ, ता. मालेगाव जि. नाशिक ) यास ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता पिंपळ चौकातील रिक्षा चोरी केल्याचे कबूल केले.हिरे यास न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी  दिली. हिरे याच्या कडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने नाशिक शहरातून सहा रिक्षा चोरी करून मालेगाव येथे त्या भाडेतत्वावर चालवण्यास दिल्याची कबुली दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे