आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

कुसुंब्यात अपना ग्रुपच्या वतीने नेत्र शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिर संपन्न..

झूम मराठी न्यूज नेटवर्क

कुसुंबा (झूम मराठी)कुसुंब्यात अपना ग्रुपच्या वतीने नेत्र शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित रुग्णांवर  धुळे शहरातील शारदा नेत्रालय टीम कडून उपचार कारण्यात आले.

जच्या धकााधकीच्या जीवनशैलीत अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. हे आजार झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. मधुमेहाचा परिणाम सर्वात अगोदर डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांची निगा कशी राखायची याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते. हे आजार होऊ नये यासाठी शारदा नेत्रालय व अपना ग्रुप च्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले होते.

धुळे शहरातील शारदा नेत्रालय व अपना ग्रुप च्या संयुक्त विद्यमाने नेत्र शस्त्रक्रिया व नेत्र शिबीर आयोजित करण्यात आले सदर शिबीर आयोजन  अपना ग्रुप अध्यक्ष मुस्ताकभैय्या शेख, दिनेश रायते, दिगंबर परदेशी, कुसुंबा येथील पोलिस पाटील आकाश सुरेश भदाणे, अफजल पिंजारी, बट्टी महाले, मायकल चौधरी, अशोक कासार, महाराष्ट्र राज्य चे उत्तर महाराष्ट्र ओबीसी राष्ट्रीय महासंघ अध्यक्ष आप्पासाहेब भटु पुंडलिक चौधरी व खान्देश तेली समाज मंडळ धुळे जिल्हा उपाध्यक्ष जयवंतराव चौधरी, चंद्रकांत चौधरी, राकेश चौधरी, मनोज भाऊ चिलेदे महिला पदाधिकारी सौ मालती ताई चौधरी यांनी कुसुंबा,चौगाव,गोताणे, खेडे, कवठी, व आजुबाजूच्या परिसरातील अनेक गोरगरीब जनतेसाठी खुले नैत्र शिबीर आयोजित करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे