आपल खान्देशआरोग्य व शिक्षण
फैज मल्टीपर्पज फाऊंडेशन व फस्ट एड फाऊंडेशन यांच्या सहकार्याने फैजपूरात निशुल्क भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न
झूम मराठी
फैजपूर (प्रतिनिधी) न्यु फैज मल्टीपर्पज फाऊंडेशन, गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आणि फस्ट एड फाऊंडेशन, जळगाव यांच्या सहकार्याने आज फैजपूर गावात निशुल्क भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होत.
सदर शिबिरात मोफत इसीजी, टू डी इको तपासणी, मधुमेह, रक्तदाब तपासणी याशिवाय मासिक पाळीच्या समस्या, वंध्यत्व, गर्भपिशवीचे विकार, कान-नाक-घशा संदर्भातील विकार, दारुमुळे उद्भवणार्या विकारांवर उपचार, मोतिबिंदू तसेच मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची तपासणी तज्ञांद्वारे करण्यात आली, निशुल्क भव्य महाआरोग्य शिबिरात नागरीकानी भरभरुन प्रतिसाद दिला, न्यू फैज आणि फस्ट एड फाऊंडेशनचेही आभार, यापुढेही आले सहकार्य अपेक्षित आहे. शिबिरासाठी रत्नशेखर जैन, विशाल शेजवळ आदींचे सहकार्य लाभले.




