आपल खान्देशगुन्हेगारी

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई गुटखाचा ट्रक केला जप्त!

चाळीसगावात ग्रामीण पोलीसांनी आज गुटख्याचा कंटेनर पकडला असून यात सुमारे एक कोटीचा मुद्देमाल असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करणे सुरू आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगावात ग्रामीण पोलीसांनी एका कंटेनवर संशय आल्याने त्याचा पाठलाग करून पकडला. सदर कंटेनरची अधिक तपासणी केली असता मध्ये गच्च गुटखा भरलेला असल्याचे दिसून आले. दरम्यान या कंटनेरमध्ये कदाचित एक कोटीचा गुटखा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या धडाकेबाज कामगिरीमुळे ग्रामीण पोलीसांचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे. तत्पूर्वी (क्र. एच. आर. ३८ एबी ६०९६ ) असे पकडलेल्या गाडीचा नंबर आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणे सुरू आहेत.

दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने यामुळे गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच भुसावळ येथे अशाच प्रकारे मोठी कारवाई करण्यात आली होती. यानंतर चाळीसगावातही कंटेनर जप्त करण्यात आल्यामुळे गुटखा तस्करीची पाळेमुळे तालुक्यात असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे