ब्रेकिंग

कॉंग्रेसच्या डॉक्टर सेल प्रदेश सरचिटणीसपदी पाचोऱ्याचे डॉ साळवे यांची वर्णी…


पाचोरा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या डॉक्टर सेल वर प्रदेश सरचिटणीसपदी डॉ अनिरुद्ध साळवे यांची नियुक्ती करण्यात आली.  जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या शिफारशी वरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेल चे अध्यक्ष .डॉ.मनोज राका यांनी डॉ साळवे यांची डॉक्टर सेल च्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली सदरच्या नियुक्ती चे पत्र महाराष्ट्र कॉग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष आ. नानाभाउ पटोले यांच्या हस्ते मुंबई येथील टिळक भवनात देण्यात आले.

यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नानाभाउ पटोले यांनी पक्षाच्या संघटनेसाठी योगदान देवुन पक्षाची विचारसरणी घराघरात पोहोचले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. या नियुक्ती बद्दल कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांच्या सह पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे