आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले उद्या जळगाव जिल्हा दौर्‍यावर

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले हे उद्या बुधवार(दि. २३) रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.

 

प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर आमदार नाना पटोले हे प्रथमच जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. दि. २३ रोजी स. ५.३० वा. भुसावळ येथे त्यांचे आगमन होणार आहे. सकाळी ९ वा. धनाजी नाना महाविद्यालय येथे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्याचे दहन आणि यावल, रावेर, मुक्त ाईनगर या तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळावा. सकाळी ११.३० भुसावळ येथे रामचंद्र सभागृहात भुसावळ, जामनेर, बोदवड तालुक्यातील शेतकर्‍यांचा मेळावा आणि कार्यकर्ता संवाद, दुपारी १ वा. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे कोविड सेंटरला भेट व कोविड योध्यांचा सन्मान आणि जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक, दुपारी ३ वा. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, सायंकाळी ५ वा. काँग्रेस भवन येथे शहर व ग्रामीणमधील कार्यकर्त्यांशी संवाद, सायंकाळी ६ वा. एरंडोलकडे प्रयाण, रात्री ८ वा. अमळनेर येथे चोपडा, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा या तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद, रात्री. ९.३० वा. किसान काँग्रेस बैठक, रात्री १०.३० वा. अमळनेर येथून धुळ्याकडे ते प्रयाण करणार आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे