महाराष्ट्रराजकीय

प्रशासकीय कारणास्तव काल जाहीर झालेली पोलीस भरती पुढे ढकलली..

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनी समाधान व्यक्त केले होते. पण त्यांचा पुन्हा हिरमोड झाला आहे.

 राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून १४ हजार ९५६ जागांसाठी जाहीर केलेली पोलीस भरतीची प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलली आहे. ही पोलीस भरती जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पुढे ढकलली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकीय कारणास्तव ही पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. या भरतीची नवी जाहिरात लवकरच प्रकाशित होणार आहे.

खरं तर राज्यातील हजारो तरुण या पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी जोरदार तयारी करत आहेत. काही तरुणांनी तर पोलीस भरतीसाठी आंदोलन केल्याचेही समोर आले होते. या दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीची परीक्षा लवकरच जाहीर होईल, असे आश्वासन दिले होते.त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर कालच पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. पण आज ही पोलीस भरती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी ३ नोव्हेंबरला अर्ज भरायला सुरुवात होणार होती. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांनी समाधान व्यक्त केले होते. पण त्यांचा पुन्हा हिरमोड झाला आहे. आज पोलीस महासंचालक कार्यालयाकडून एक प्रसिद्धिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रशासकीय कारणास्तव भरती स्थगित करण्यात येत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच भरतीबाबत नवी जाहिरात लवकर जाहीर करण्यात येईल, असेही प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे