ब्रेकिंग

इतिहासाची साक्ष देणाऱ्या माऊली गडावर अवघ्या चार वर्षीय धनगर कन्या कडून यशस्वी चढाई

इतिहासाची साक्ष देणाऱ्या माऊली गडावर अवघ्या चार वर्षीय धनगर कन्या कडून यशस्वी चढाई 

ठाणे (प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्याकडून पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबीय व मुलांसाठी दिनांक 21 नोव्हेंबर 2019 रोजी शहापूर तालुक्यातील माहुलीगडावर चढाई आयोजित केली होती ही चढाई सकाळी 7.00वा वाजता सुरुवात झाली सदर चढाई मध्ये आपल्या धनगर समाजाचे ठाणे ग्रामीण पोलीस दलातीळ अमोलकुमार होळकर त्यांच्या पत्नी सुनीता होळकर यांची कन्या प्रणिती अमोलकुमार होळकर वय वर्ष 11 तसेच छोटा पॅकेट बडा धमाका कुमारी राजेश्वरी अमोलकुमार होळकर वय चार वर्षे अगदी तरुणांनाही लाजवेल अशी कामगिरी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे या कन्येने एवढ्या लहान वयामध्ये इतिहासाची साक्ष देणाऱ्या मुघलांना घाम फोडणार्‍या इंग्रजांना कापावा ला लागणाऱ्या अशा या अवघड अशा माऊली गडाची यशस्वीपणे चढाई करून तितक्याच उत्साहाने ती उतरण केली. त्याबद्दल अशा या छोट्या राजेश्वरी चे माननीय पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण व इतर ट्रॅक्टर्स पोलीस बांधवांकडून व त्यांच्या कुटुंबीयांकडून व समाजाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या तिच्या कामगिरीबद्दल तिला प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे आहे.

इतिहासामध्ये आपल्या धनगर समाजातील शूर लोकांनी ऐतिहासिक कामगिरी केल्याचे दिसून येत आहे त्या शूर वीरांचे स्मरण म्हणून आपल्या धनगर कन्येने एवढी मोठी कामगिरी केल्याचे समाजाला तिचा सार्थ अभिमान वाटत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे