ब्रेकिंग

Pachora News | पाचोरा तालुका संजय गांधी योजना समितीच्या सदस्यपदी बापुभाऊ हटकर यांची वर्णी..

पाचोरा (झूम मराठी) संजय गांधी योजना समितीमध्ये सदस्यपदी बापुभाऊ हटकर यांची वर्णी लागल्याने पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील तसेच हमाल -मापाडी संघटनेच्यावतीने बापू हटकर यांचा सत्कार करण्यात आला.

पाचोरा भडगाव विधानसभेचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांनी निवडलेली समिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिफारस करून मंजुरी दिली आहे. यानुसार संजय गांधी योजना समिती वर सदस्यपदी बापु हटकर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आल्याने पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील  तसेच हमाल मापाडी यांच्या संघटने कडुन सत्कार करून सन्मानीत करण्यात आले.

त्यावेळी बापु भाऊ हटकर यांनी सदरील समितीवर गोरगरीब गरज वंतांची कामं करावी व सर्वाना योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या. सत्कार प्रसंगी पाचोरा कृ.उ.बा.स.चे हमाल-मापाडी संचालक  युसूफ पटेल यांच्या सह असंख्य हमाल -मापाडी महिला कामगार, तसेच बाजार समितीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे