ब्रेकिंग

प्रतीक महाजन यांची परधाडे ग्रामपंचायत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड..

पाचोरा (झूम मराठी) तालुक्यातील परधाडे येथे सरपंच शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न झाली असून ग्रामसभेत सर्वानुमते परधाडे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रतीक महाजन यांची निवड करण्यात आली. प्रतीक महाजन हे परधाडे गावातील एक तरुण पत्रकार असून सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.

तंटामुक्ती समिती ही गावातील विविध वाद-विवाद आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष हे गावातील शिक्षित व्यक्ती म्हणून प्रतीक महाजन यांची निवड करण्यात आली आहे. प्रतीक महाजन यांनी निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी गावातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि गावातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी माझ्या सर्वोत्तम प्रयत्न करेन.” प्रतीक महाजन यांची निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे