आपल खान्देश

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पाचोरा नगर परिषद कर्मचारी यांनी घेतली शपथ

झूम मराठी वृत्त

पाचोरा (दिलीप परदेशी) आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पाचोरा नगर परिषद कर्मचारी व बिएलओ यांच्या मार्फत सर्वसामान्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेतली. भारतात राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी २५ जानेवारी रोजी साजरा केला जातो.

भारतातील प्रत्येक नागरिकासाठी मतदार दिन महत्त्वाचा आहे, या दिवशी भारतातील प्रत्येक नागरिकाने आपल्या राष्ट्राच्या प्रत्येक निवडणुकीत सहभाग घेण्याची शपथ घेतली पाहिजे, कारण भारतातील प्रत्येक व्यक्तीचे मत देशाच्या भविष्याचा पाया घालते.

पाचोरा नगर परिषद अधिकारी, कर्मचारी आणि सर्वसामान्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेतली, यावेळी उपस्थित मुख्याधिकारी व प्रशासक श्रीमती शोभा बाविस्कर, उपमुख्यअधिकारी मराठे साहेब, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले साहेब समवेत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे