भडगाव पाचोरा दरम्यान रस्त्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनांस आमदार व प्रांतधिकारी यांची भेट
झूम मराठी वृत्त
पाचोरा भडगाव पाचोरा दरम्यान रस्त्याचे काम रोड विकासकाने अपुरे सोडले.भडगाव कडून पाचोरा कडे जातांना तितूर नदीच्या पुलावर रस्ता अचानक बंद आहे. गेल्याकाही दिवसापासून अपघात प्रमाण वाढलेत म्हणून काम पूर्ण करा या मागणीसाठी पाचोरा जागृत मंचाने आंदोलन सुरु केले आहे, सदर आंदोलनास स्थानिक आमदार किशोर आप्पा पाटील व पाचोराचे प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी भेट घेऊन आंदोलन कर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी आंदोलनाची स्थिती आणि येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या व पर्यायी रस्ता लवकरात लवकर तयार होणार असे अस्वासन दिले.
आपल्या पाचोरा-भडगांवचे आमदार किशोरआप्पा पाटील व पाचोराचे प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी उपोषण स्थळी हायवे आँथिरीटी व ठेकेदार प्रतिनीधी यांच्याशी दोघांनी जूना मार्ग तातडीने डांबरी बनवून सुरु करण्याविषयी सुचना केल्यात.
यासह आमची प्रमुख मागणी सदरील हायवे सामन्यपणे तितूर नदीच्या दोन्ही बाजूला चौपदरीकरणाचे काम सुरु करण्याविषयी योग्य ते कागदपत्रे पडताळणी करुन लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले, असे आंदोलनकर्ते नीलकंठ पाटील यांनी झूम मराठीशी बोलतांना सांगितले.




