आपल खान्देश

भडगाव तालुक्यातील भोरटेक शिवारातील शेतातील ऊस अज्ञात माथेफिरुने कापून फेकले

झूम मराठी वृत्तसेवा

भडगांव : कजगाव येथून जवळच असलेल्या भोरटेक शिवारातील शेतातील ऊस अज्ञात माथेफिरुने कापून फेकल्याने शेतकऱ्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. भोरटेक येथील शेतकरी अर्जुन रामदास पाटील यांनी आपल्या भोरटेक शिवारातील शेतात दोन एकर उसाची लागवड केली. शेतातील ऊस अज्ञात माथेफिरुने विळ्याच्या साह्याने जमीनदोस्त केल्याची घटना घडली आहे. सकाळी अर्जुन पाटील यांचा मुलगा नामदेव पाटील शेतात गेल्यावर त्यांच्या लक्षात ही घटना आली व त्यांनी आपल्या वडीलांना घटनेची कल्पना दिली. निर्दयी माथेफिरुने कापून फेकलेला ऊस आता फक्त गुरांच्या कामासाठी उपयोगात येणार आहे. त्यामुळे संबंधितांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. घडलेल्या घटनेने परीसरात चिंता व्यक्त केली जात आहे. दोन एकर क्षेत्रातील जवळपास वीस गुंठे ऊस तोडून फेकून दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशी दुर्दैवी घटना घडल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे

चार दिवसात दुसरी घटना

फक्त चार दिवसांपूर्वीच विक्रम कौतिक महाजन ह्या शेतकऱ्यांचा आठ एकर वरील ऊस संशयास्पद रित्या जळून खाक झाला होता. मात्र, आता माथेफिरूच्या उपद्व्यापामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे