नगरपालिका मुख्यधिकारी प्रशांत ठोंबरे यांचा खुलासा दिशाभूल करणारा- माहिती अधिकार कार्यकर्ता नारायण जेठवाणी
नगरपालिका मुख्यधिकारी प्रशांत ठोंबरे यांचा खुलासा दिशाभूल करणारा-नारायण जेठवाणी
चाळीसगाव(प्रतिनिधी)शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते नारायण जेठवाणी यांनी माजी नगरसेवक शेखर कन्हैयालाल बजाज व इतरांच्या अतिक्रमण काढण्याबाबत दि.24 जानेवारी 2022 ला उपोषण तर दि.26 जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा नगरपलिका प्रशासनला दिला होता.
चाळीसगाव नगरपालिका प्रशासनाने त्यांच्या तक्रार अर्जाबाबत लेखी उत्तर देत आपली अतिक्रमणा संदर्भातील तक्रार ही न्याय प्रविष्ट असल्यांचा केलेला खुलासा हा दिशाभूल करणारा असल्याचा आरोप नारायण जेठवाणी यांनी केला आहे.नगरसेवक शेखर बजाज यांचे नगरसेवक पद रद्द करावे ही बाब न्याय प्रविष्ट असून अतिक्रमण संदर्भात कोणतीही तक्रार न्यायप्रविष्ट नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.अतिक्रमण संदर्भात जिल्हाधिकार्यांकडे केलेल्या तक्रारीच्या अनुंषगाने तात्कलिन मुख्यधिकारी अनिकेत मानोरकर यांनी चौकशी करत सदर जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याची बाब मान्य केली आहे.त्यामुळे मुख्यधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी केलेला खुलासा हा पूर्णपणे चुकीचा असून अतिक्रमण धारकांचा बचाव करण्यासाठी ते खोटा खुलासा करत असल्याचा ठाम मत देखील त्यांनी व्यक्त केले आहे.मुख्यधिकारी नगरपालिका अधिनियमा विरोधात वागत असून अतिक्रमणधारकांचा बचाव करणारी त्यांची कृती निषेधार्थ आहे.त्यांना तक्रारी अर्जाबरोबर सर्व कागदपत्रे दिली असतांना सुध्दा त्यांची शहानिशा न करता पत्राद्वारे केलेला खुलासा करून त्यांनी कर्तृत्वात कसूर केला असून त्यांच्या विरोधात लवकरंच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देखील नारायण जेठवाणी यांनी दिला आहे. सध्या कोरोना या साथरोगाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने मुख्याधिकारी यानी उपोषणाच्या व आत्मदहनाचा निर्णय मागे घेऊन नगरपालिकेस सहकार्य करण्यास केलेल्या विनंती प्रमाणे कोरोनामुळे नियोजित उपोषण पुढे ढकलण्यात आले असून कोविड निर्बध उठल्यानंतर आपल्या उपोषण व आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


