आपल खान्देश
विघ्नहर्ता हॉस्पिटल पाचोराच्या वतीने, आगीत घर जळालेल्या ज्योतीबाई भोई यांना आर्थिक मदत
झूम मराठी वृत्त
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ज्योतीबाई भोई यांच्या घराला काही दिवसांपूर्वी आग लागली होती, आगीत धान्य, पैसे, कपडे, भांडे कागदपत्रे व इतर संसारोपयोगी साहित्यांचे नुकसान झाले होते. त्यांच्यावर खूप वाईट वेळ आली त्यांच्या मदतीसाठी तालुक्यातून विघ्नहर्ता हॉस्पिटल पाचोरा यांचे वतीने आज फुल नाही पण फुलाची पाकळी असे पंचवीस हजारांची मदत करण्यात आली.
ज्योतीबाई भोई ह्या विधवा आहेत व त्यांच्यावर 4 मुलींच्या लग्नाची जबाबदारी आहे. आपली सामाजिक जबाबदारी ओळखून अनेक दाते मदतीसाठी पुढे येत असतांना आज, त्यांना मदत म्हणून डॉ.भुषणदादा मगर संचालक विघ्नहर्ता हॉस्पिटल पाचोरा यांचेतर्फे पंचवीस हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी ज्योतीताईंच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.



