आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

नाशिकच्या काळाराम मंदिरातील महाआरतीत, वैशालीताई सुर्यवंशींचा सहभाग..


पाचोरा (प्रतिनिधी ) शिवसेना-उबाठा पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात झालेल्या महाआरतीत वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभाग घेऊन प्रभू श्रीरामाला वंदन केले.

 अयोध्या येथे श्रीरामलल्ला यांच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यानिमित्त शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यानंतर वैशालीताई या नाशिक येथे रवाना झाल्या. तेथे गोदातीरावर असलेल्या ऐतिहासीक श्री काळाराम मंदिरात उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत महाआरतीचे आयोजन करण्यात आले.

या महाआरतीमध्ये सौ. वैशालीताई सुर्यवंशी या आपल्या सहकार्‍यांसह सहभागी झाल्या. त्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. तर उध्दव ठाकरे यांच्यासह पक्षाच्या नेत्यांसोबत त्यांनी चर्चा देखील केली. दरम्यान, आज उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे सकाळी पक्षाची बैठक होणार असून सायंकाळी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना देखील वैशालीताई सुर्यवंशी या उपस्थित राहणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे