रेमेडिसीव्हर सुनियंत्रीत करण्यासाठी राष्ट्र कल्याण पार्टी व प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे धरने आंदोलन…
रेमेडिसीव्हर इंजेक्शन चा पुरवठा सुरळीत व सुनियंत्रीत करण्यासाठी राष्ट्र कल्याण पार्टी व प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे धरने आंदोलन…
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व वाढती रुग्ण संख्येमुळे रेमेडिसीव्हर इंजेक्शन चा तुटवडा होत असुन रुग्णांचे हाल होत आहेत. अन्न व औषध प्रशासनच्या निर्देशानुसार रेमेडिसीव्हर इंजेक्शनचा पुरवठा सर्वच कोविड रूग्णालयांना करणे आहे. तरी देखील कोविड रूग्णालय व्यवस्थापन रूग्णांना रेमेडिसीव्हर इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगत आहे. याबाबत अन्न व औषध अधिकारी यांना तक्रार करुन देखील इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन हे शासनाच्या नियमानुसार १४७० रुपये मध्ये उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश आहेत, परंतु वितरक ३५०० ते ४००० रुपये रुग्णांकडुन घेत रुग्णांची लुट करत आहेत. ठाणे जिल्ह्यातील रुग्णांना रेमेडिसीव्हर इंजेक्शन चा पुरवठा सुरळीत होण्यासाठी तसेच काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी त्याची विक्री / वितरण सुनियंत्रीत करण्यासाठी सह आयुक्त औषध प्रशासन कोकण विभाग, ठाणे यांच्या कार्यालय मध्ये राष्ट्र कल्याण पार्टी अध्यक्ष शैलेश तिवारी, प्रहार जनशक्ती पक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील , शरद सोनवणे , दिपक लढे यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी श्री. पौनिकर साहेब, सह आयुक्त (औषध), कोकण विभाग यांनी त्वरित संबंधितां सोबत चर्चा करुन ४ ते ५ दिवसा मध्ये सर्व कोविड रुग्णालय मध्ये इंजेक्शनचा साठा उपलब्ध करणार, तसेच रुग्णांना इंजेक्शन शासन मान्य दरानेच रुग्णालयामध्ये उपलब्ध करणार आणि जे कोणी काळाबाजार व साठेबाजी करतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भरारी पथक त्वरित चालु करु असे आंदोलन कर्त्यांना आश्वासन दिले. त्यानंतर धरने आंदोलन थांबवन्यात आले आहे असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.



