माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात पिंपळगाव – बांबरुड माध्यमिक विदयालया’चे माजी विद्यार्थी रमले जुन्या आठवणीत.
भडगाव | दिलीप जय परदेशी
भडगाव तालुक्यातील पिपंळगाव बांबरुड च्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळेच्या 1997-1998 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. तब्बल 27 वर्षांच्या कालावधीनंतर एकत्र भेटलेल्या मित्र मैत्रिणी शाळेतील आठवणीत रममाण झाले.
जुने मित्र, त्यांच्यासोबत शिकत असताना घडलेले गमतीदार किस्से, शिक्षण घेत असताना काढलेल्या एकमेकांच्या खोड्या, झालेली भांडणे रुसवे, फुगवे या साऱ्या आठवणीत ‘ते’ रमले. निमित्त होते पिपंळगाव बांबरुड च्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात घेण्यात आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे. तब्बल 27 वर्षांनंतर सर्व वर्गमित्र परत एकाच मंचावर आले होते. धकाधकीच्या जीवनातून 1997 – 98 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संपर्क साधून स्नेहमेळावा घेतला. त्यासाठी त्यावेळचे सर्व वर्गमित्र व शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. शाळेच्या इमारतीत माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी.जी. पाटील सर व उपस्थित आदरणीय तत्कालीन शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपुजन गणेशपूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंदाचे स्वागत व सन्मान भेट देउन सत्कार केला. आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपले नाव, काम, व्यवसाय, प्रगती याबाबत आपला अल्पपरीचय करुन दिला,
युट्युब व्हिडीओ द्वारे पहा आपले क्षण चित्र.
विद्यार्थ्यानी आपल्या भावना अतिशय दिलखुलास पणे व्यक्त केल्या व दृश्य अदृश्य यशात ज्ञान व संस्काराची शिदोरी शिक्षकांची आहे म्हणून सत्कार करुन आभार व्यक्त करण्यासाठी व जुन्या आठवणीसह मित्रांना भेटण्यासाठी हा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना, जुना काळ ते कष्टप्रद जीवन हे सअश्रु नयनांनी शिक्षकांविषयी ऋण व्यक्त केले.
माजी विद्यार्थ्यांनीं शाळेला एक भेट म्हणून साउंड सिस्टम, शहीद दिन निमित्त भगतसिंग, राजगुरू, सुकदेव यांची सुंदर अशी प्रतिमा भेट देण्यात आली. आपल्या माजी विदयार्थ्यांना शिक्षकांच्या वतीने बी.जी.पाटील, एस.पी.पाटील, चव्हाण सर, व्ही ए पाटील, ए. आर .पाटील, मांडोळे सर यांनी मनोगत व्यक्त केले.
माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत. आजही त्यांना आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या शाळेचा विसर पडला नाही, हे विशेष. या सुंदर कार्यक्रमासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व वर्गमित्र व मैत्रिणींनी आपली नोकरी, व्यवसाय, कुुटुंब आदीबाबत माहिती दिली. एकमेकांची ख्याली-खुशाली विचारली. शालेय जीवनातील किस्से व आठवणींना सांगून खूप धमाल केली. त्यावेळच्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच भेटत राहण्याचा संकल्प करुन एकमेकांचा निरोप घेतला.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संदीप गोसावी, दीपेश पाटील, योगेश ठाकरे, तर संदीप पाटील, प्रफुल्ल पाटील, भरत ठाकरे, बाबाजी पाटील, नरेंद्र जाधव, अविनाश पाटील, रामभाऊ पाटील,प्रवीण पाटील नरेंद्र पाटील, सुरेश पाटील, प्रवीण पाटील, दिवान परदेशी, अरुण पाटील, पवन परदेशी, एकनाथ पाटील, आधार पाटील, सुनील ,पाटील, सर्जेराव गांगुर्डे, कौतिक बागुल, योगेश पाटील, किशोर पाटील, प्रवीण पाटील, प्रमोद पाटील, बापू पाटील, शरद पाटील, दीपक परदेशी, ज्ञानेश्वर पाटील, अतुल चौधरी. मुलींमध्ये विजया पाटील, वंदना पाटील, साधना पाटील, मनीषा पाटील, शकुंतला पाटील, मनीषा पाटील, मालू पाटील, प्रेरणा पाटील, मनीषा पाटील, संगीता पाटील, रत्ना पाटील, सुरेखा पाटील, अनिता ठाकरे हे सर्व माझी विद्यार्थी हजर होते.
स्नेह संमेलनाचे सूत्रसंचालन संदीप गोसावी यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप गोसावी योगेश ठाकरे, भारत ठाकरे, साधना पाटील व सर्व माजी विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.


