आपल खान्देश
जळगाव जिल्हा संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या जिल्हाअध्यक्षपदी शिवश्री ह. भ. प. अनिल मराठे महाराज यांची नियुक्ती
जळगाव (झूम मराठी) जळगाव जिल्हा संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या जिल्हाअध्यक्षपदी शिवश्री हभप अनिल मराठे महाराज यांची नियुक्ती झाली.
याप्रसंगी त्यांची आज माजी मंत्री बापूसाहेब के. एम. पाटील यांचे नातू शिवश्री जयदेव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज पाचोरा येथे भेट घेतली व वारकरी परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल शिवश्री ह. भ. प. अनिल मराठे महाराज यांना शुभेच्छा देताना शिवश्री जयदेव पाटील यांच्यासोबत शिवश्री रवींद्रभाऊ पाटील मराठा सेवा संघाचे एस.ए पाटीलसर, शिवश्री राजुभाऊ पाटील शिवश्री अरुणदादा पितांबर पाटील आदी दिसत आहे.



