आपल खान्देश

पाचोऱ्यात दिव्यांग बांधवांचे विविध मागण्यांसाठी रास्ता रोको

झूम मराठी वृत्तसेवा

पाचोरा शहारात राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विविध मागण्यांना साठी पाचोरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यात दिव्यांगाना स्वतंत्र शिधा पत्रिका व शासन नियमानुसार घरकुल मिळावे, शासन नियमानुसार 35 किलो धान्य मिळावे, ग्रामपंचायत 5% निधी मिळावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.


दरम्यान, नायब तहसीलदार संभाजी पाटील यांनी पुढील सोमवारी पर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच गट विकास अधिकारी यांची संयुक्त बैठक करून बाकी समस्या सोडवणे सांगितले. तर पुरवठा अधिकारी अभिजित येवले यांनी सोमवार रोजी राशन कार्ड देणार आणि पुढील ६० दिवसात अंत्योदय लाभ ३५ किलो धान्य देणार असल्याचे आश्वासन दिले.

राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे संचालक विकास लोहार, डॉ.निळकंठ पाटील, संगीता हटकर, भारत वाघे, रवींद्र दिलीप, सुनील लोहार, बडगुजर व दशरथ भडांगे व तालुक्यातून दिव्यांग बांधव उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे