आपल खान्देशमहाराष्ट्र

पहुरात भाजपने महावितरण कार्यालयावर धडक देऊन, कार्यालयाला ठोकले कुलूप!


झूम मराठी

पहूर (प्रतिनिधी) पहूर व आसपासातील शिवारात शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता सरसकट कृषी रोहीत्राचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्या मुळे संतप्त भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी महवितरण च्या विरोधात मोर्चा रस्तावर ठिय्या आंदोलन केले आणि कार्यालयाला कुलूप ठोकले.

भारतीय जनता पार्टी पहूर व शेतकरी यांनी पहूर महावितरण कार्यालयात धाव घेतली त्यावेळेस गेले दोन तास पदाधिकारी व शेतकरी थांबून होते परंतु निवेदन घेण्यासाठी शेतकऱ्याच्या समस्या ऐकण्यासाठी कुणी आले नाही.  त्यामुळे तेथील कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले, भारतीय जनता पार्टी व शेतकऱ्यांनी पहूर बस स्टॅन्ड रास्ता रोको करण्यात आला, शेतकऱ्यांचा रोष पाहता पहूर पोलिस स्टेशन चे पी.आय इंगळे साहेब व कार्यकारी अभियंता भुसावळ श्री घोरुडे साहेब निवेदन स्विकारण्यासाठी आले व वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले, त्यावेळेस पहूर पेठ व कसबे ग्रामपंचायत च्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी सरपंच पती रामेश्र्वर पाटील ,शंकर जाधव , राजधर पांढरे ,उपसरपंच राजु जाधव ,कृ.उ.बा.समिती सभापती संजय देशमुख ,राजधर पांढरे , मा सरपंच लक्ष्मण गोरे , ईश्र्वर देशमुख ,योगेश भडांगे अबु तडवी , सोनु बाविस्कर ,दिनकर पवार ज्ञानेश्वर पाटील,श्री‌.ज्ञानेश्वर पांढरे , युसुब बाबा, संतोष चिंचोले,शिवाजी राऊत , श्री.किरण पाटील , शेरीकर, बाबुराव आस्कर श्री.मधुकर बनकर,राहुल ढेंगाळे व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे