आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

बैल शेतात शिरल्याने, पुतण्याला काकाने काठीने मारून केले ठार…

झूम मराठी

पाचोरा (झूम मराठी) पाचोरा तालुक्यातील वाडी-शेवाळे येथील वाळी गावाच्या शिवारात पुतण्याचा बैल शेतात शिरल्याचा राग येवुन काकाने पुतण्यास तर चुलत काकाने चुलत पुतण्यास काठीने डोक्यात वार केल्याने ४३ वर्षीय पुतण्या हा गंभीर झाल्यानंतर त्यांना जळगांव येथे गोदावरी हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर बुधवारी त्याचेवर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाल्याने पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला असुन पोलिसांनी मयताच्या चुलत भावास ताब्यात घेतले आहे. 

या घटनेबाबत पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांकडुन प्राप्त माहिती अशी की, वाडी , (शेवाळे) ता. पाचोरा येथील प्रल्हाद मोतीराम भोसले व त्याचा पुतण्या पुनमचंद भोसले यांची शेत जमिन शेजारी असल्याने पुनमचंद भावराव भोसले यांचा मुलगा किरण पुनमचंद भोसले यांची बैलजोडी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान प्रल्हाद मोतीराम भोसले यांच्या शेतात शिरल्याचा राग येवुन प्रल्हाद भोसले याने त्याच्या नात्याने लागणारा नातु किरण पुनमचंद भोसले यांच्या पाठीत काठीने वार केला. तर प्रल्हाद भोसले यांचा मुलगा गणेश भोसले याने पुनमचंद भोसले यांच्या डोक्यात काठीने जोरदार वार केला. यामुळे पुनमचंद हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जळगांव येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते.

दरम्यान २७ नोव्हेंबर रोजी शेतात बैल शिरल्याच्या किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याने किरण पुनमचंद भोसले याने चुलत आजोबा प्रल्हाद मोतीराम भोसले व गणेश भोसले यांचे विरुध्द २७ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्याने सहाय्यक फौजदार रविंद्र पाटील, किरण ब्राह्मणे, अरुण राजपुत यांनी वाडी येथे जावुन गणेश भोसले यास ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गणेश भोसले ३० नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान किरण भोसले याचे वडिल पुनमचंद भोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पुनमचंद भोसले यांचा मृत्यू झाल्याने प्रल्हाद भोसले व गणेश भोसले यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार हे करत आहेत 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे