Pachora | भरमसाठ वीजबिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले असतांना, महावितरणने अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा दिला ‘शॉक’..
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
पाचोरा (झूम मराठी) महावितरणकडून गेल्या वर्षीपासून अतिरिक्त सुरक्षा ठेव देयक सुरु करण्यात आले आहे. चालू बिलाच्या दुप्पट ही अतिरिक्त सुरक्षा ठेव आकारली जात आहे. ‘अतिरिक्त सुरक्षा ठेव संबंधीत वीजग्राहक एकाच वेळी किंवा दरमहा 6 समान हप्ता या प्रमाणे भरू शकतो. महावितरणने वीज बिलांसोबत ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिलही दिले आहे, महागाईने सामान्य ग्राहक होरपळत आहेत. भरमसाठ वीजबिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच महावितरणने ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा ‘शॉक’ दिला आहे. ही बिल पाहून अनेक वीजग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.
सर्वसामान्य जनतेमध्ये रोष..
राज्याची लोकसंख्या जवळपास 12 कोटी इतकी आहे. जर फक्त 6 कोटी वीजग्राहक या प्रमाणे प्रत्येकी 1700 रुपये अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम वसूल केली तर अब्ज रुपये जमा होतात. महावितरण कंपनीने ही अतिरिक्त सुरक्षा ठेव देयक वीजग्राहकांच्या माथी मारून मोठ्या प्रमाणात लूट करण्याचे षडयंत्र रचले आहे.
ज्यांनी पूर्वी सुरक्षा ठेव भरली आहे, अशा वीजग्राहकांनादेखील ही अतिरिक्त सुरक्षा ठेव भरावी लागणार आहे. पूर्वी नवीन वीजजोडणी घेताना जी अनामत रक्कम घेतली जात होती. ती शेवटपर्यंत तसीच राहत होती. परंतु, महावितरण कंपनीने ही जाचक अशी अतिरिक्त सुरक्षा ठेव ग्राहकांच्यावर लादली असून, या अन्यायकारक अतिरिक्त सुरक्षा ठेव देयकाविरुद्ध आता सर्वसामान्य जनता आवाज उठवू लागली आहे.
महावितरणने वीज बिलांसोबत ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिलही दिले आहे. यातून एकट्या पाचोरा तालुक्यातून करोडो रुपये वीज ग्राहकांच्या खिशातून वसूल केले जाणार आहे. अगोदरचं महागाईने सामान्य ग्राहक होरपळत आहेत. भरमसाठ वीजबिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच महावितरणने ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा ‘शॉक’ दिला आहे. त्यामुळे वीज ग्राहक हवालदिल झाले असून ठेवीचे पैसे भरायचे कोठून हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. त्यामुळे ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे.



