आपल खान्देश

शेतक-याची बारा लाखाची फसवणूक, चाळीसगावच्या ऊस तोडणी मुकदमावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

शेतक-याची बारा लाखाची फसवणूक, चाळीसगावच्या ऊस तोडणी मुकदमावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

दौंड तालुक्यातील खामगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी संदिप शांताराम जगताप यांच्या ऊसास तोडणीसाठी मजुर आणण्यासाठी 12 लाख रुपये उच्चल घेवून ही उस तोडणी मजुर न पुरवल्याने मुकादमावर फसवणुक केल्याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

आबासाहेब सुखदेव बागुल (रा.चिंचगव्हाण, ता. चाळीसगांव, जि.जळगाव) असे या गुन्हा दाखल झालेल्या मुकादमाचे नाव आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शेतकरी संदिप जगताप यांच्या उस तोडणीसाठी मजुरांची आवश्यकता होती. त्यामुळे ऊस तोडणी मुकादम आबासाहेब बागुल यांच्याशी संपर्क केला असता, त्याने उस तोडण्यासाठी मजुर देऊ, त्यासाठी बारा लाख रुपये लागतील असे सांगितले.

त्यास बारा लाख रुपये दिले. मात्र बारा लाख रुपये उच्चल घेवून मुकादम हा पसार झाला. त्याने शेतकऱ्यास ठरल्याप्रमाणे ऊस तोडणी मजुर पुरवले नाहीत. या मुकादमाने आपली फसवणुक केली असल्याचे लक्षात आल्याने शेतकरी संदिप जगताप यांनी याबाबत यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.

याप्रकरणी मुकादामावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित ऊस तोडणी मुकादम हा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.लवकरच त्याला अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

दरम्यान, दौंड तालुक्यात यवत पोलीस स्टेशनच्या हदद्दीत गुऱ्हाळांची संख्या मोठी आहे. अनेक गुऱ्हाळ मालकांना ऊस तोड मजुरांची गरज असते. नगर, बीड, मराठावाडा, विदर्भ या भागातील ऊस तोडणी मजुर उस तोडणीचे काम करतात. त्यासाठी ऊस तोडणी मजुर पुरवण्याचे काम हे मुकादम करीत असतात.

अनेक मुकदाम हे ऊस तोडणी मजुर देण्याच्या नावाखाली शेतकरी आणि गुऱ्हाळ मालकांकडून लाखो रूपये घेवून पसार होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. फसवणुक होवूनही अनेक शेतकरी असा ऊस तोडणी मुकादमाच्या खोट्या आश्वासनाला बळी पडत असल्याचे चित्र आहे.

ZOOM Advertising

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे