आपल खान्देश

जळगाव जिल्ह्यातील बहुजन समाज पार्टीच्या चोपडा विधानसभा कार्यकारणी जाहिर..

झूम मराठी ऑनलाईन | जळगाव

बहुजन समाज पक्षाच्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. असून जिल्हाध्यक्ष भीमराव खैरे आणि जळगाव जिल्हा महासचिव सचिन अशोक बाविस्कर यांनी नवीन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली असून, जळगाव जिल्हाध्यक्षांनी सांगितले की, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड. सुनिलजी डोंगरे  यांच्या आदेशान्वये जाहीर करण्यात आहे.

बहुजन समाज पाटीॅ ही तथागत गौतम बुध्द, सम्राट आशोक, संत कबीर, संत रविदास, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, छत्रपती शाहूजी महाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, व  बसपा नेते कांशीराम यांच्या विचारांची एकमेव वारसदार व भारताची तिसर्‍या क्रमांकांची राष्ट्रीय पाटीॅ असून ह्या राष्ट्रीय पाटीॅची जबाबदारी तुम्हाला मिळाली आहे. ही अतिशय आंनदाची व गौरवाची बाब आहे ही जबाबदारी तुम्ही अतिशय प्रमाणीक पणाने पार पाडणार अशी आशा व अपेक्षा ठेवतो असे म्हणत जळगाव जिल्हाध्यक्ष भीमराव खैरे यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

भाईदास दामू बाविस्कर -चोपडा विधानसभा प्रभारी, श्रीकांत सजन सैंदाने – चोपडा विधानसभाध्यक्ष, विजय दयाराम मोरे- चोपडा विधानसभा उपाअध्यक्ष, विठ्ठल भालचंद्र पाटील (शिंदे) – चोपडा विधानसभा महासचिव, मिलिंद बापुराव सोनवणे- चोपडा विधानसभा सचिव, तुषार रविंद्र सिरसाट- चोपडा विधानसभा बीव्हीफ संयोजक चोपडा शहर अध्यक्ष- वसंंत युवराज वाल्हे.

अशा प्रकारची नवनिर्वाचित विधानसभेची कार्यकारणी बनविण्यात असून  यावेळी प्रताप भार्डू सोय, राकेश मधुकर शिरसाठ, समाधान वानखेडे, जगदीश भालेराव, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे