आपल खान्देशगुन्हेगारी

सीमा तपासणी नाक्यावर आरटीओचा खासगी पंटरला तपासणी नाक्यावर ५० रुपये लाचेची मागणी आणि झाले जेरबंद

नवापूर : सीमा तपासणी नाक्यावर गुजरात राज्यातून मालवाहू चारचाकी वाहन (टेम्पो) महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी वाहन चालकांकडून ५० रुपयांची लाच घेताना आरटीओचा खासगी पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. या कारवाईमुळे प्रादेशिक परिवहन मंडळाच्या कामकाजावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याबात ३९ वर्षीय एका व्यक्तीने तक्रार केली होती. नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील खासगी पंटर इरसाल हन्नान पठाण (वय ४७, रा. लाखाणी पार्क, नवापूर) याला ५० रुपायांची लाच घेताना ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

मालवाहू चारचाकी वाहन (टेम्पो) गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अखत्यारीतील नवापूर सिमा तपासणी नाक्यावर ५० रुपये लाचेची मागणी केली. सदर रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर खासगी व्यक्ती इरसाल हन्नान पठाण यास रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले


ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक एन. बी. थोरात, पोलिस हवालदार राजेश सुवारे, हर्षद तारी, योगेंद्र परदेशी, पोलिस नाईक पदमाकर पारधी यांनी कारवाई केली.

नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा येथील सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्‍यांच्या हस्तकांकडून एन्ट्रीच्या नावाने पैसे उकळले जात असल्याचे नेहमी आरोप केले जातात. या तपासणी नाक्यावर नेहमीच एजंट ठाण मांडून असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे