आपल खान्देश

पाचोरा महसूल विभागाची धडक कारवाई..!

पाचोरा तालुक्यात अवैध वाळू उपसा तसेच अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने आपली धडक मोहीम अधिक तीव्र केली आहे. दि.१० फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गस्ती पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारे एक डंपर आणि एक ट्रॅक्टर जप्त केले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे वाळू चोरट्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द ते खडकदेवळा बुद्रुक या रस्त्यावर करण्यात आली, जिथे अवैध वाळू घेऊन जाणारे डंपर पथकाने ताबा मिळवत जप्त केले. तर दुसऱ्या कारवाईत मौजे बांबरुड येथून वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडण्यात आला. ही दोन्ही वाहने पाचोरा तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. एकाच दिवशी झालेल्या या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

महसूल विभागाने कुरंगी येथून गिरणा नदीपात्रात जाण्यासाठीचा मुख्य रस्ता खोदून ठेवला असला, तरी वाळू माफिया इतर चोरवाटांचा वापर करून वाहतूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. मात्र, भरारी पथकांच्या सतर्कतेमुळे त्यांचे हे प्रयत्न फसत आहेत.

मंडळ अधिकारी सुनील पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली असून या पथकात ग्राम महसूल अधिकारी सागर बागुल, रितेश गोसावी, रामकृष्ण बळी, अतुल पाटील आणि वाहन चालक विश्वेश सपकाळे ह्या पथकाने कारवाई केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे