आपल खान्देशब्रेकिंग

Pachora Heavy Accident | पाचोऱ्यात कॉलेज चौकात भीषण अपघातात दोघांचे पाय गुडग्यापासून निखळले..

घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रक्ताचा सडा पडला असून नागरिकांनी घटना स्थळी मोठी गर्दी केली होती

पाचोरा (झूम मराठी) मुंबईहुन फळ वाहतूक करणाऱ्या भरधाव महेंद्रा पिकअपने पाचोरा शहरातील कॉलेज गेट जवळच महाराणा प्रताप चौकात चौघांना उडवल्याने दोघांचे पाय निकामी झाले तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या अपघाताने शहरात मोठी खळबळ उडाली असून पिकअप चालकाला अटक करण्यात आली आहे. अपघातात वाहनाची धडक इतकी जोरदार होती की एका दुचाकीसह महेंद्रा बोलेरो पिकअपचा पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा होवून घटनास्थळी रक्ताचा सडा पडला. या प्रकरणी पाचोरा पोलिसानीं महेंद्रा बोलेरो पिकअप चालकाला ताब्यात घेतले आहॆ.

मुंबईहून भडगावमार्गे बुलढाण्याकडे भरधाव चालक श्रावण रतनसिंग घोती (23, बुलढाणा) हा सफरचंद आदी फळे घेवून पिकअप (क्रमांक एम.एच. 48 बी.एम.7943) ने भरधाव वेगाने निघाला असताना पाचोरा शहरातील महाराणा प्रताप चौकात नियंत्रण सुटल्याने श्री दत्त मंदिरासमोरील ओट्यावर बसलेल्या चौघांच्या अंगावर जावून वाहन धडकल्याने दोघांचे पाय गुडख्यापासून निखळले तर दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातात एका दुचाकीचा चुराडा झाला असून महेंद्रा बोलेरोचा पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला तर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रक्ताचा सडा पडला असून नागरिकांनी घटना स्थळी मोठी गर्दी केली होती.

या भीषण अपघातात वसंत भाईदास पाटील (42, सुरत), विनोद बारकू पाटील (50, रा. पाचोरा), अमोल वाघ (27, रा. पाचोरा) व कुंदन सुनीलसिंग परदेशी (17, रा. पुनगाव ता., पाचोरा) गंभीर जखमी झाले. बोलेरोच्या जोरदार धडकेत वसंत पाटील व विनोद पाटील यांचे गुडघ्यापासुन दोन्ही पाय निकामी झाले तर उर्वरीत दोघे जखमी झाले. विशेष म्हणजे वसंत पाटील हे नातेवाईकांच्या लग्नासाठी सुरत येथून खाजगी ट्रॅव्हल्सने पाचोरा येथे आले होते व मंदिराच्या ओट्यावर बसलेल्या लोकांना ते लग्नस्थळाचा पत्ता विचारत असतानाच भीषण अपघातात त्यांचे पाय निकामी झाले. विनोद पाटील हे घरातील एकमेव कमावते असल्याने व प्रतिकूल परीस्थितीत काम करीत असल्याने वाळू वाहतूकदार तरुणांनी त्यांच्या उपचारासाठी पैसे जमा केले.

अपघाताची माहिती मिळताच पाचोरा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, कॉन्स्टेबल योगेश पाटील, राहुल बेहरे, राष्ट्रवादीचे प्रकाश भोसले, प्रा. सी. एन. चौधरी यांनी घटनास्थळी दाखल होत त्यांच्यासह सहकाऱ्यांनी जखमींना तत्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. पाचोरा निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अपघाताची माहिती घेत पिकअप चालकाला अटक केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे