आपल खान्देश

पाचोऱ्यातील हे वाळलेले झाड कोसळण्याच्या स्थितीत!

झूम मराठी वृत्तसेवा

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील छत्रपती राजे संभाजी स्मारका समोरील झाड गेल्या अनेक दिवसांपासून वाळलेले आहे, धोकेदायक वाळलेले मोठे झाड कोसळण्याच्या स्थितीत असून वादळाने ते केव्हाही कोसळू शकते. त्यामुळे एखादेवेळी अप्रिय घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

झाडा जवळच महावितरणचा मेन लाइन खांब आहे. वादळवाऱ्यात हे झाड या तारेवर कोसळण्याची दाट शक्यता आहे. तसे घडल्यास परिसरातील रोहित्र बंद पडण्याची भीती आहे. यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित होऊ शकतो

तरी संबंधित पालिका अधिकारी झाड पडून दुर्घटना होण्याची वाट बघत आहे काय?, असा खडा सवाल येणारे जाणारे नागरिक करीत आहेत. सदर वाळलेले झाड त्वरित काढा व त्या जागी दुसरे झाड लावावे अशी मागणी सदर बातमी द्वारे “झूम मराठी” करीत आहे आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे