ब्रेकिंग

करोनाचा कहर आज जळगाव जिल्ह्यात 1093 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

करोनाचा कहर जळगाव जिल्ह्यात 1093 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

जळगाव प्रतिनिधी l आज दिवसभरामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये तब्बल 1093 इतके कोरोना पॉझिटिव्ह Jalgaon Corona News Today रुग्ण आढळून आले असून यातील सर्वाधिक कोरोना पेशंट हे जळगाव शहरातील असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

आज जळगाव शहरात सर्वाधीक म्हणजे तब्बल Jalgaon Corona News Today  356 पेशंट आढळून आले आहेत. शहरच्या सर्व भागांमधील हा संसर्ग असल्याचे रिपोर्टमधून दिसून आले आहे. याच्या खालोखाल चोपडा येथे १०० तर चाळीसगावात ९५  कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता जळगाव तालुका-३६;  भुसावळ -६६.  अमळनेर-७६ ;   पाचोरा-१२; भडगाव-२२; धरणगाव-७०; यावल-४३; एरंडोल-५५; जामनेर-३१; रावेर-३५,  पारोळा-२५ ;  मुक्ताईनगर-३३ ; बोदवड-३३ आणि इतर जिल्ह्यातील ५  असे रूग्ण आढळून आले आहेत.

आज जिल्हाभरात १२  कोरोना बाधीत रूग्णांचे मृत्यू झालेले असल्याची बाब देखील चिंताजनक अशी आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण मृत झालेल्या रूग्णांचा आकडा पंधराशेच्या पार म्हणजे १५१३  इतका पोहचला आहे. तर जिल्ह्यात आज ७०७ रूग्णांना ऑक्सीजन लावण्यात आलेला असून ३४४  रूग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज एकूण ९९७७  इतक्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे