राज्यात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून आज 28 डिसेंबर आणि उद्या पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला असल्याने अकोल्यामध्ये आज दुपारी दोनच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोबतच जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे ,या पावसामुळे सर्वात जास्त फटका रब्बी पिकांना बसला असून हरभरा आणि गव्हाचे पिकाचे नुकसान झाले आहे. आज अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे.
हवामान विभागाने विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तसेच वातावरणातील थंडी ही गायब झाली आहे. दरम्यान, दुपारी पावणेदोनच्या सुमारास रिमझिम पावसाने हजेरी लावली. थोड्याचवेळाने विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाने जोरदार हेजरी लावली. जवळपास एक ते दीड तास पाऊस पडत राहिला.
जोरदार पावसासोबत गारांचाही वर्षाव झाला. काही भागात तुरळक तर काही भागात जास्त प्रमाणात गारांचा पाऊस पडला. लहान स्वरूपाच्या गारा पडल्या. विशेष म्हणजे, संपूर्ण पावसाळ्यात गारांचा पाऊस पडला नव्हता. गडद ढगांमुळे वातावरणात काळोख निर्माण झाला होता. भरदुपारी सायंकाळ झाल्याचा अनुभव अकोलेकराना होत होता
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा