आपल खान्देश

राहुल गांधी जन्मदिन सप्ताहात पाचोर्यात महीला कॉग्रेस ने केले वृक्षारोपण

पाचोरा (प्रतिनिधी) – येथील महीला कॉग्रेस च्या वतीने कॉलनी भागात वृक्षारोपण करण्यात आले

देशाचे नेते खा राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा कॉग्रेस संकल्प सप्ताह साजरा करीत आहे या सप्ताहात विविध आंदोलने, निदर्शने सह समाजाला उपयुक्त अशी कामे करीत आहेत याचाच एक भाग म्हणून महीला कॉग्रेस ने सद्गुरु नगर परीसरातील खुल्या भुखंडात वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेतला. यावेळी महीला तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार यांच्या सह जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे, शीला सुर्यवंशी स्थानिक रहीवाशी नलिनी देसले, प्रमिला पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितीच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले असून प्रत्येक लावलेले झाडाचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा अल्पसंख्यक उपाध्यक्ष इरफान मनियार, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, रविंद्र नेवे, बापुराव देसले, भास्कर पाटील, प्रभाकर पाटील, विनोद चौधरी,पंकज पाटील, श्री. कुमावत, यश सुर्यवंशी, ऋषीकेश पाटील, गुणवंत जाधव आदी उपस्थितीत होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे