चाळीसगाव मधील शांतीदेवी पॉलिटेक्नीकचे प्राचार्य अपघातात ठार..
दुचाकीला उडवल्याने प्राचार्यांचा मृत्यू
झूम मराठी
चाळीसगाव : भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत चाळीसगावच्या शांतीदेवी पॉलिटेक्नीक महाविद्यालयाचे प्राचार्य जागीच ठार झाले. हा अपघात शनिवार, 9 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास धुळे रोडवरील शांतीदेवी कॉलेजजवळ घडला. दीपक आधार पाटील (45, भामरे, ता.चाळीसगाव) असे मयत प्राचार्यांचे नाव आहे.
दुचाकीला उडवल्याने प्राचार्यांचा मृत्यू
चाळीसगाव तालुक्यातील भामरे येथील रहिवासी दीपक आधार पाटील (45) हे शनिवारी सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी दुचाकी बुलेट (एम.एच.19-6237) ने निघाले असतानाच भरधाव कंटेनर (आर.जे. 14 जी.जे. 8508) ने बुलेटला जोरदार धडक दिल्याने दीपक पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पाटील यांच्या खिशातील कागदपत्रे रस्त्यावर पडली व त्यातील ओळखपत्रामुळे लागलीच त्यांची ओळख पटली. ग्रामीण पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत कंटेनर ताब्यात घेतले. प्राचार्यांच्या अपघाती मृत्यूमुळे भामरे गावात शोककळा पसरली.



