आपल खान्देश

पाचोरा लाईव्ह – गो. से. हायस्कूल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली

पाचोरा तालुका सहकारी संस्था संचलित श्री.गो. से. हायस्कूल पाचोरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

पाचोरा (प्रतिनिधी) गो से हायस्कूल पाचोरा येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शालेय स्तरावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या विषयावर विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या विषयावर विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामध्ये विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात आले. व सावित्रीच्या वेशामध्ये विविध विद्यार्थिनींनी भाग घेतला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिलाताई वाघ, शाळेचे पर्यवेक्षक श्री नरेंद्र पाटील, आर एल पाटील, ए बी अहिरे सांस्कृतिक विभाग प्रमुख आर बी तडवी, उपप्रमुख आर बी बोरसे ज्येष्ठ शिक्षिका सौ.अंजली गोहील ,सौ. छाया सूर्यवंशी, महेश कौण्डिन्य, संजय दत्तू , कोळी सर व सदस्य श्री.अरुण कुमावत , कार्यालय अधीक्षक अजय सिनकर ,संगीत शिक्षक थोरात हे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देविदास थोरात.

महाजन उपस्थित होते याप्रसंगी विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें यांच्यावर आपले मनोगत व्यक्त केले, शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा ,वकृत्व स्पर्धापरीक्षेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सौ.वैशाली कुमावत, सौ.ज्योती पाटील ,सौ .गायत्री पाटील ,सौ. अंजली गोहिल यांचाही गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख रक्कम , सोनाई बहुद्देशीय संस्थेमार्फत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बोरसे, आभार प्रदर्शन श्री रवींद्र जाधव यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम हा सोशल डिस्टंसिंग ठेवून पूर्णपणे सुरक्षित होईल याची आज लोकांनी संपूर्ण काळजी घेतली होती विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य उत्सव पाहून सर्वच भारावले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे