आपल खान्देशमराठवाडामहाराष्ट्र

राज्यातील ठेलारी समाजाला पंचवीस तीस वर्षानंतर मिळाला न्याय…


राज्यातील ठेलारी समाजाला एन टी ‘ ब मधून एन टी ‘ क मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला असून तसा जीआर काढलेला आहे, महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचा ठेलारी समाजाने आनंद उत्सव साजरा केला, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार मानले, 

पद्मश्री माजी खासदार डॉ. विकास महात्मे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती, माननीय मंत्री अतुलजी सावे, माननीय मंत्री संजयजी बनसोडे या सर्वांना पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला, व सत्कार करण्यात आला, सदर मागणी साठीठेलारी समाजाचे नेते रमेश सरक, विठ्ठल मारणर यांनी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. प्रदेशाध्यक्ष आनंद बनसोडे, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी, ठेलारी समाजाचे नेते विठ्ठल भाऊ मारणार, बाबासाहेब दगडे, संदीप माने, वामनराव मारणार, पावा गोवेकर, देवा गोयकर, बापू कोळपे, गोपाल सोनू, लक्ष्मण शिंदे, राजू पाल यांनी सर्वांचे आभार मानून सत्कार केला. लवकरच एक मोठा कार्यक्रम घेऊन जाहीर सत्कार करण्यात येईल असे सांगितले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे