महाराष्ट्र

केंद्र शासन व राज्य शासनाच्या विरोधात बहुजन सत्यशोधक संघाचा अकलूज प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा..

 

जिल्हा प्रतिनिधी:- विनोद नागटिळक
बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली अकलूज प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी बहुजन सत्यशोधक संघ राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ म्हणाले की,
राजस्थानमध्ये नऊ वर्षाच्या मुलाने मटक्यातील पाणी पिला म्हणून कुमार इंद्रजीत मेगवाल या विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली,
मातंग समाजातील जनार्दन कासारे यांची निघृन हत्याकांड करणाऱ्या जातीवादी गावगुंडांवर 302 /ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी न करण्यामुळे जातीवादी लोकांकडून एससी. एसटीवर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार वाढत आहे, एससी, एसटी च्या लोकांवरती 395 सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जात आहेत. या शासनाचा जेवढा निषेध करेल तेवढा कमी आहे व ओबीसी ची जातनिहाय जनगणना न करणाऱ्या सरकारच्या विरोधामध्ये येणाऱ्या काळामध्ये बहुजन सत्यशोधक संघ तीव्र आंदोलन केली जातील असे ते म्हणाले. डॉ. कुमार लोंढे म्हणाले की, बहुजन समाजाने जागृत होऊन युवकांनी फुले शाहू आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवून राष्ट्रीय आंदोलन निर्माण करणे गरजेचे आहे, इंदु मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची उंची कमी केली असली तरी बाबासाहेबांच्या विचारावर येथील युवक क्रांती केल्याशिवाय राहणार नाही असे लोंढे म्हणाले. यावेळेस महिंद्र लंकेश्वर म्हणाले की, पेट्रोल डिझेल खाद्यजन्य पदार्थांच्या किमती वाढवून बहुजनाला गुलाम बनवण्याचे हे जातीवादी षड्यंत्र आहे,राशन कार्ड धाराकांवरती जाचक आटी लावून राशन बंद करण्याचे षडयंत्र आहे असे लंकेश्वर म्हणाले.
प्रदीप सरवदे म्हणाले की, पुस्तकावर जीएसटी लावून बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे आहे, केंद्र सरकारने हॉस्पिटल (स्टेटमेंट फलक न लावणाऱ्या ) हॉस्पिटल वरती तात्काळ कारवाई करण्यात यावी असे सरवदे म्हणाले.
या निषेध मोर्चास युवक जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पालखे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव (बापू) लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष नेते भैय्यासाहेब बाबर, माळशिरस तालुका अध्यक्ष रहीम मोहम्मद भाई शेख, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नितीन वाघमारे, टेंभुर्णी शहराध्यक्ष रोहित जगताप, संतोष जानराव, संजय बामणे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे