आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

पाचोरा महावितरण कर्मचारीस मारहाण, गुन्हा दाखल

वीज बिल थकले म्हणून कनेक्शन का कापलं अशी विचारणा करत शिवीगाळ केली आणि थेट मारहाण...

पाचोरा (झूम – दिलीप जय परदेशी) आज पाचोरा शहरातील एका महावितरण कर्मचाऱ्याला ग्राहकांच्या गैरकृत्याचा सामना करावा लागला. या कर्मचाऱ्याला ग्राहकांकडून शिवीगाळ तर झालीच, शिवाय मारहाणही करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांवर थेट पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले. सदर घटना पाचोरा शहरातील मच्छि बाजार बाहेरपुरा येथे कर्मचाऱ्यांशी एक ग्राहक भिडला होता त्यांच्याकडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला गेला. परिणामी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वीज बिल थकले म्हणून कनेक्शन का कापलं अशी विचारणा करत शिवीगाळ केली आणि थेट मारहाण..

राज्य विद्युत वितरण कंपनी पाचोरा ता.पाचोरा जळगाव येथे वरीष्ठ तंत्रज्ञ वायरमन प्रविण सुभाष वंजारी हे पाचोरा शहरातील बाहेरपुरा, मच्छी बाजार, कृष्णापुरी, त्र्यंबक नगर, जळगाव रोडवरील भागातील (DTC 8168560,) ग्राहकांचे विद्युत वितरण लाईन मेन्टनंस, ब्रेक डाऊन थकबाकी वसुली, विद्युत वितरणा बाबत तक्रारीचे निरसण करणे असे कामकाज होते. सुमारास बाहेरपुरा भागातील मच्छी बाजारातील थकबाकी वसुलीचे व मिटर कट करण्याचे कामकाज करीत असतांना गुलाब खान अहमद खान रा. बाजार भाग बाहेरपुरा पाचोरा यांचे ग्राहक क्रं. 122515947505 असा असलेले ग्राहक यांचे कडे सुमारे दोन महिन्याचे लाईट बील थकीत असल्याने ते मीटर कनेक्शन खंडीत करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. त्यामुळे सदर मिटर कनेक्शन खंडीत केले असता तेथे हजर असलेला गुलाब खान अहमद खान यांचा मुलगा वसीम खान गुलाब खान याने आमच्या घराची लाईट का कट का केली असे बोलून शिवीगाळ करून महावितरण वरीष्ठ तंत्रज्ञ वायरमन प्रविण सुभाष वंजारी यांना मारहाण करत धमकी दिली की तुम्ही परत या भागात थकबाकी वसुली करुन दाखवा तुमचे हातपाय तोडुन तुमचे मुडदे पाडुन टाकेल अशी धमकी दिली असं फिर्यादीत म्हटले आहॆ. मारहाण करणाऱ्या  विरुधात आज दिनांक १५ रोजी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल केला असून भादवी कलम 353,332,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशन कर्मचारी करीत आहेत.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे