आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

पाचोरा – भडगाव मतदारसंघातुन पाच हजार कार्यकर्ते शेगाव जाणार भारत जोडो यात्रेत..

पाचोरा भडगाव तालुक्यातील सचिन सोमवंशी यांचे पाच हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत


पाचोरा (प्रतिनिधी) – राहुल गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मतासाठी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत शेगाव येथील विराट सभेसाठी पाचोरा – भडगाव मतदारसंघातुन पाच हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी शहर व तालुक्यातुन कॉंग्रेस पदाधिकारी यांनी शेगाव येथील विराट सभेच्या नियोजन साठी आज पाचोरा विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार होते तर भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक अॅड संदीप पाटील उपस्थित होते प्रमुखस्थानी जिल्हा सरचिटणीस जमील शेख,सेवादलाचे प्रदेश सरचिटणीस अजबराव पाटील, सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकिरा, आदी उपस्थित होते बैठकीच्या सुरवातीला तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी भारत जोडो यात्रेचे महत्व समजून सांगितले.

शेगाव विराट सभेला जवळपास पाचोरा – भडगाव मतदारसंघातुन पाच हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा संकल्प केला. यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांनी दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे जिल्ह्य़ातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत जिल्हा समन्वयक अॅड संदीप पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अॅड अमजद पठाण यांनी शहरातील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने शेगावी उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले.शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात मोफत बस आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे त्यासोबत काही खाजगी वाहने तर काही रेल्वे ने जाणार असून जवळपास पाच हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत ज्यांना एसटी बस हवी असेल त्यांनी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी व शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीत सरचिटणीस प्रताप पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र महाजन, उपाध्यक्ष शरीफ खाटीक, अरमान मौलाना,युवक कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अॅड अंबादास गिरी, विधानसभा अध्यक्ष शकील शेख, इरफान मनियार, महीला जिल्हा सरचिटणीस कुसुम पाटील, कल्पना निंबाळकर, इस्माईल तांबोळी अॅड वसिम बागवान परवेज शेख रसुल ,राहुल शिंदे, गणेश पाटील, कल्पेश येवले, धनराज देवरे, रवी सुरवाडे, आदी उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे