ब्रेकिंग

शिवसेनेचे ठाण्यातील जिल्हाप्रमुख केदार दिघेंवर बलात्काराचा गुन्हा!

झूम मराठी

ठाणे (प्रतिनिधी)शिवसेनेचे नवनियुक्त ठाणे जिल्हा अध्यक्ष केदार दिघे यांच्या विरोधात एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशन मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे हे ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे यांच्या शिवसेनेने केदार दिघे यांची ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशन मध्ये केदार दिघे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे आणि त्यांचा मित्र अशा दोन व्यक्तींविरोधात बलात्कार आणि धमकी दिलेल्या प्रकरणात पीडित महिले कडून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे.केदार दिघे यांना शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाण्यामध्ये लढा देण्याकरिता जिल्हा अध्यक्ष पदावर निवड केल्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे आणि केदार दिघे यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. आता त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने येत्या काळामध्ये केदार दिघे यांच्या अडचणीत वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे