पाचोरा कृष्णापुरी विकास सोसायटी निवडणुकीत भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचा एकतर्फी विजय!
झूम मराठी
पाचोरा येथील कृष्णापुरी विकास सोसायटीच्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचा एकतर्फी विजय झाला आहे. गेल्या २२ वर्षांपासून कृष्णापुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी वर सतीश परशराम शिंदे यांचे निर्विवाद वर्चस्व असून, यावर्षी सर्व उमेदवार विजयी झाले असून कार्यकर्ते उत्साहित होते. सोसायटीच्या निवडणुकीकडे आगामी पाचोरा नगरपालिकाची रंगीत तालीम म्हणून पहिले जात होते. अमोल शिंदे यांनी नियोजनबद्ध प्रचार करून यश मिळवले, परीवर्तन पॅनलच्या सर्व जागेवर पराभव नियोजनाच्या अभावामुळे झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत शेतकरी विकास पॅनल ला घवघवीत यश मिळाले असून सर्वच्या सर्व १३ जागांवर शेतकरी पॅनलचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत ८२६ सभासद असलेल्या या कृष्णापुरी सोसायटीत सुमारे अडीच कोटीचे ठेवी असून शंभर टक्के वसुली व नफ्यातील संस्था म्हणून सतीश शिंदे यांनी २२ वर्षापासून कारभार हाताळला आहे त्याचे फलित म्हणून शेतकऱ्यांनी कृष्णापुरी सोसायटीवर पुनश्च सतीश शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी पॅनल एक हाती सत्ता मिळावीण्यास यशस्वी ठरले.
सर्व शेतकरी पॅनल च्या उमेदवाराचे ढोलताशांच्या गजरात स्वागत मिरवणूक काढुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृष्णापुरी विकास सोसायटी निवडणूक निकाल
जनरल जागा ( एकूण ८ जागा )
परिवर्तन पॅनल निशाणी- पतंग
- १)चौधरी बापू दौलत २७७
- २) चौधरी सतीश नारायण २९३
- ३)देवरे सुरेश रुपचंद -२७५
- ४) पाटील संतोष पांडुरंग -२९७
- ५)पाटील सुभाष गिरधर -२९९
- ६)पाटील स्वप्नील विजय -२८३
- ७)सिनकर अभिजीत वसंत-२८०
- ८) सोनवणे सुदर्शन आत्माराम २६८
शेतकरी विकास पॅनल निशाणी – पतंग
- १)अहिरे दिगंबर रामदास -३४६(विजयी)
- २)चौधरी शिवाजी अर्जुन-३३९(विजयी)
- ३) चव्हाण हेमंत ज्ञानदेव -३४२(विजयी)
- ४)महाजन शिवाजी गोविंदा -३४७(विजयी)
- ५)नागणे दिलीप भिका -३३१(विजयी)
- ६) पाटील काशीनाथ रामभाऊ -३४९(विजयी)
- ७) पाटील ओमप्रकाश प्रभाकर -३५२ (विजयी)
- ८) शिंदे सतिष परशराम -३७४ (विजयी)
ओबीसी प्रवर्ग (एकूण १ जागा)
- परिवर्तन पॅनल निशाणी -कपबशी
- १)चौधरी विष्णू देवराम- २८७
- शेतकरी विकास पॅनल निशाणी- पतंग
- २) चौधरी प्रकाश एकनाथ- ४११(विजयी)
- बाद मते- ३०
महिला राखीव जागा एकूण २ जागा
परिवर्तन पॅनल निशाणी- कपबशी
- १) पाटील इंदूबाई प्रकाश २७३
- २) पाटील कुसुमबाई रामदास २९२
शेतकरी विकास पॅनल निशाणी- पतंग
- ३) बोरसे मुक्ताबाई सीताराम ३७९
- ४) शिंदे सिंधुताई पंडितराव ४००
एस सी एस टी प्रवर्ग* एकूण १ जागा
परिवर्तन पॅनल निशाणी – कपबशी
- १) ब्राह्मणे फकीरा सांडू -३०७
शेतकरी विकास पॅनल निशाणी- पतंग
- २) देसाई प्रेमलाल शामलाल -३८८(विजयी)
- २९ मते बाद
विमुक्त जाती भटक्या जमाती* एकूण १ जागा
परिवर्तन पॅनल निशाणी – कपबशी
- १) भोई रवींद्र बाबूलाल – २८१
शेतकरी विकास पॅनल निशाणी- पतंग
- २) हटकर धोंडू भिवसन – ४१३ (विजयी)
- बाद मते-३०


