आपल खान्देश

धक्कादायक – मधमाशाच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखम..!


पाचोरा (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्याच्या शिंधोड गावामध्ये मधमाशाच्या (Honey Bee) हल्ल्यात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नावं सैय्यद सबदर सैयद इस्माईल असून त्यांचा मुलगा ही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

सविस्तर असे की, काल दुपारी सुमारे चार वाजे दरम्यान रोजंदारी करून घरी निघाले असता समोरील झाडा जवळून जात होते, यावेळी त्यांच्यावर अचानक मधमाशांनी (Honey Bee) हल्ला चढविला. यात मुलगा व बाप गंभीर जखमी झाले होते, थोडया वेळात सैय्यद सबदर सैयद इस्माईल यांचा त्यांच्या मुला देखतच जीव सोडला तर मुलासही मधमाशांनी चावा घेतल्याने मृत्यशी झुंज देणाऱ्या त्यांच्या मुलास आबिद सैय्यद सबदर वय वर्ष २६ यास उपचारासाठी पाचोरा येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते, योग्य वेळी योग्य उपचार होत असल्याने सद्य त्याची परिस्थितीत सुधारणा असल्याचे सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ स्वप्नील पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे