सोयगांव तालुका प्रतिनीधी- घोसला तालुका सोयगाव येथे के एम हॉस्पिटल पुणे आणि एकात्मिक ग्रामीण कृषी विकास संस्थेच्या वतीने गरीब गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी केम हॉस्पिटल पुणे यांचे प्रमुख आणि एकात्मिक कृषी विकास संस्थेच्या संचालिका मीनाक्षी बिराजदार घोसला सरपंच सुवर्णा पाटिल पवित्रा युवरे यांच्या हस्ते किमान १५० कुटुंबांना अन्नधान्याचे किट व गरजू वस्तूंचे वाटप करण्यात आले
अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या खरीपा मुळे मजुरांच्या हाताला कामे नव्हती त्यामुळे याची दखल संभाजी नागणे यांनी घेत संबंधित संस्थेने व हॉस्पिटलने समाजोपयोगी उपक्रम म्हणून या वितरणाचा घोसला ,ऊमरविहीरा, निमखेडी, गावात निर्णय घेतला .
यावेळी सरपंच सौ. सुवर्णा ताई पाटील पवित्रा युवरे यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला .
या प्रसंगी घोसला सरपंच सुवर्णा पाटील ऊमरविहीरा सरपंच पती गजानन पवार शंकर पाटील मोहन परदेशी निव्रुत्ती सागरे आबा ऊगले अमोल बोरसे चरण पाटिल बापु वाघ बंन्डु चव्हाण राज्यु चव्हाण सदस्य अलकाबाई संजय पाटील प्रतिभा दीपक पाटील प्रतिभा सोमु रमेश तडवी गणेश कैलास माळी.
उपक्रमाचे आयोजन गावातील अण्णाभाऊ साठे चौकात करण्यात आले.
चौकट- के ई एम हॉस्पिटल पुणे आणि एकात्मिक कृषी विकास संस्था यांच्या या उपक्रमाचे गोरगरीब गरजू लाभार्थ्यांनी कौतुक करून संबंधित संस्था ही आमच्यासाठी वरदान ठरली आहे या संस्थे संबंधित राबवण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये आम्ही श्रमाने पुढाकार घेऊ असे आश्वासन यावेळी ग्रामस्थ व मजुरांनी दिले.
फोटो ओळ- एकात्मिक कृषी विकास संस्थेच्या संचालिका मीनाक्षी बिराजदार गरीब व गरजू लोकांना धान्याचे किट वाटप करताना.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा