आपल खान्देशमहाराष्ट्र

राज्य सरकारच्या एका निर्णयावर खडसे नाराज

जळगाव – पंढरपूरच्या वारीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्बंधांवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुक्ताईनगर येथील मुक्ताबाईची पालखी गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरला जात असते हा पालखी सोहळा गेल्या अनेक वर्षापासून साजरा होत आहे. या पायी वारीमध्ये अनेक लोक सामील होत असतात. पण कोरोनामुळे दोन ववर्षांपासून पायी वारीला बंदी आहे.

” राज्य सरकारने या पालखी सोहळ्यासाठी शंभर जणांना एसटीमधून जाण्यासाठी परवानगी दिली आहे‌. पांडुरंगाच्या दर्शनासाठी जगभरातला वारकरी आसुसलेला असतो आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन व्हावं ही वारकऱ्यांची इच्छा असते. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून राज्य सरकारला प्रस्ताव अनेक पाठवलेले होते, या प्रस्तावांचा विचार झाला असता तर अनेक वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घेता आले असते अशी खंत एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे