आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार?

जळगाव | राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅ. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव दौऱ्यावर असलेले नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी काल (१० जुलै) अ‍ॅ.उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अ‍ॅ. उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड बराचवेळ चर्चाही सुरु होती. या चर्चेचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, त्यामुळे उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे.

विशेष म्हणजे गेल्या महिन्यात जळगाव दौऱ्यावर असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे अ‍ॅ. उज्वल निकम यांना भेटल्याने शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अ‍ॅ. उज्ज्वल निकम यांना राजकारणात येण्याची ऑफर दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अ‍ॅ. उज्वल निकम यांना राज्यसभेवर पाठवण्याचा मानस होता. मात्र, अ‍ॅ. उज्ज्वल निकम यांनी हा प्रस्ताव दोनवेळा नाकारला होता. आतादेखील उज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना पक्षातर्फे राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आरक्षण उठल्यास तिकडून निवडणूक लढवण्याचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.

उज्ज्वल निकम काय म्हणाले?

मी अद्याप राजकारणात येण्याचा विचार केलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझी बंद दाराआड चर्चा झाली. मात्र, त्याचा तपशील आत्ताच सांगता येणार नाही. यापूर्वी मी शरद पवार यांचा प्रस्तावही नाकारला होता. खासदार संजय राऊत आणि माझी गेल्या महिन्यातील भेट ही केवळ सदिच्छा भेट होती. माझे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असल्याने ते घरी येतात, असे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे