आपल खान्देश

Bhadgoan | एकलव्य संघटनेची जळगाव लोकसभा विभागीय बैठक सुधाकरराव वाघ यांच्या उपस्थितीत संपन्न…

झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

भडगाव (झूम मराठी) आदिवासी भिल्ल समाजाच्या हक्क व न्यायासाठी लढणारी संघटना म्हणुन ओळख असलेली एकलव्य संघटनेची जळगांव लोकसभा विभागीय बैठक भडगांव शहरात संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांच्या प्रमुख उपस्थिती घेण्यात आली व संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे नवनवीन उपक्रम तसेच आदिवासी भिल्ल समाजाचे विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली यावेळी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येत उपस्थिती होते.

एकलव्य संघटनेची जळगांव लोकसभेचे आदिवासी प्रकल्प कार्यालय स्वतंत्र भडगांव येथे करण्यात यावे तसेच जळगांव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस आदिवासी यांना बोगस जातीचे प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने वाटत होत असणे बाबत, जातीचे प्रमाणपत्र, घरकूल, रेशनकार्ड, गायरान जमीन, दफनभूमी, वनजमीन, ह्या विषयावर चर्चा करण्यात आली व नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तसेच संघटनेच्या माध्यमातून वरील विषयावर प्रत्येक तालुक्यात मोर्चे आंदोलन घेत आपल्या समस्या शासन दरबारी मांडून आपले प्रश्न सोडून घेण्यासाठी येत्या १० जुलै रोजी चाळीसगांव तालुक्यातून मोर्चाला एकलव्य संघटनेच्या माध्यमातून सुरवात होणार असून लवकरच एकलव्य संघटनेचा महामोर्चा जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात येणार असल्याचे ह्या वेळी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ यांनी उपस्थिती पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी बोलताना सांगितले. तसेच नाशिक जिल्ह्यात आदिवासी वस्तीगृहीत विद्यार्थीनी वर झालेल्या अत्याचारा विरोध निषेध करण्यात आले ह्या वेळी बैठकीला जळगांव लोकसभा जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, युवा जिल्हाध्यक्ष रविंद्र सोनवणे,  दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष  ऋषीदादा सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सोनवणे, जिल्हाध्यक्ष पिंटूभाऊ गायकवाड, जिल्हा संघटक पिंटूभाऊ सोनवणे, जिल्हा संपर्क प्रमुख  रोहिदास जाधव, जिल्हा सचिव दादाभाऊ बहिर, भडगाव तालुकाध्यक्ष दशरथ मोरे, पाचोरा तालुकाध्यक्ष गणेश वाघ, चाळीसगांव तालुकाध्यक्ष मोती पवार, धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पवार, जळगांव, तालुकाध्यक्ष राहुल ठाकरे एरंडोल तालुकाध्यक्ष वाल्मिक सोनवणे, पारोळा तालुकाध्यक्ष गणेश गायकवाड तसेच सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यावेळी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते बैठकीला उपस्थिती सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार प्रदर्शन भडगाव तालुका कमिटीने ह्यावेळी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे