दापोडीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी..
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. मा नगरसेवक नाना काटे यांचा कार्यलयात दापोडी
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी उमेश पाटील) आरक्षण देणारा पहिला राजा जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाही त्यांना एक रुपया दंड ठोकणारा राजा कला संस्कृती क्रीडा शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा अंधश्रद्धा कर्मकांडे दैववाद यावर प्रहार करणारा राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सलमान करणार राजा व तसेच त्यांनी सर्वच क्षेत्रामध्ये आपल्या वेगळाच ठसा उमटवणारा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दापोडी मध्ये त्यांच्या प्रतिमेस संजय नाना काटे यांच्या शुभहस्ते हार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी आज राजश्री शाहू महाराज असते तर खरोखरच त्यांना जे अंधश्रद्धा कर्मकांडे देववाद पाहून त्यांना चीड आली असती आणि हे सर्व घालायचं असेल तर राजश्री शाहू महाराज यांनी जे शिकवण दिली त्यांचं सर्वांनी पालन करावे असे गौरव उद्धगार संजय नाना काटे यांनी व्यक्त केले विनायक काटे, लक्ष्मीकांत बाराथे, विजय शिंदे, जयसिंग काटे, निखिल मते, सदगुरू काटे, धनराज कांबळे, राजाराम काटे यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र बाईत यांनी केले. आभार प्रर्दशन कालीचरण पाटोळे यांनी केले.


