आपल खान्देशब्रेकिंग

स्वराज्य पक्षाचे उमदेवार प्रताप नाना पाटील यांच्या पाचोरामधील जोरदार शक्तिप्रदर्शनाची चर्चा..

पाचोरा (झूम मराठी ऑनलाईन) पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रताप हरी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतांना मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांच्या समर्थकांची झालेल्या गर्दीची चर्चा बुधवारी, दिवसभर समाज माध्यमात होत होती.

परिवर्तन महाशक्तीमधून तिसरी आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उतरली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती सोबत न जाता परिवर्तन महाशक्तीमध्ये माजी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या स्वराज्य पक्षातुन प्रताप हरी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.

पाचोऱ्यात मंगळवारी माजी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या उपस्थितीत स्वराज्य पक्षाचे उमदेवार प्रताप हरी पाटील यांनी बैल गाड्यावर रॅली काढण्यात आली,  छत्रपती संभाजी राजे चौक येथून आपल्या संख्य समर्थकां समवेत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांच्या समर्थकांची झालेल्या गर्दीची चर्चा बुधवारी, दिवसभर समाज माध्यमात होत होती. प्रताप हरी पाटील यांना मानणारा मोठा गट पाचोरा भडगाव तालुक्यात असून त्यांनी आपला विजय निश्चित आहेत असे प्रसार माध्यमातून सांगितले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे