आपल खान्देशगुन्हेगारी

जळगाव जिल्ह्यात यावल येथील ग्रामसेवक तडवी व त्यांच्या कुटूंबियांनी पत्रकारांवर केला भ्याड हल्ला!



जिल्ह्यातच काय संपुर्ण भारतात पत्रकार संकटात सापडले आहेत. पत्रकारिता करणे अवघड झाले असुन पत्रकार संरक्षण कायदा परत ऐरणीचा विषय झाला!पण अजुनही शासन प्रशासन पत्रकाराविषयीची तात्परता दाखवत नाही. फक्त बोलायच आणि अमंलात काहीच आणायच नाही.

यावल : तालुक्यातील परसाळे येथे दैनिक खान्देश विश्ववेध चे मुख्य कार्यकारी संपादक तथा स्पीड न्यूज महाराष्ट्र चे ब्युरो चीफ अशोक तायडे हे आपल्या टीम सोबत वृत्त संकलनासाठी गेले असता. राज्यात वीज टंचाई असताना मात्र परसाडे ग्रामपंचायत कार्यालयातील दिवसा लाईट सुरू असल्याचे त्याना दिसले त्यानंतर त्यांनी सुरू असलेल्या लाईटचे चित्रीकरण करून तेथील बसलेल्या नागरिकांना प्रतिक्रिया विचारल्यात मात्र नागरिकांनी कॅमेरा समोर बोलणे टाळले, त्यानंतर टीमने गावात जाऊन गावातील समस्या जाणून घेतल्या असता गावातील घरकुलांमध्ये परसाडे येथील ग्रामसेवक मजीत तडवी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. तर तडवी हे प्रत्येक घरकुल मंजूर करण्यासाठी संबधीत लाभार्थ्यांकडून 10 ते 15 हजार रुपये घेत असल्याचे सांगितले व त्यातील काही रक्कम हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावे लागत असल्याचे तडवी हे सांगत असल्याचे सांगितले मग हे वरिष्ठ कोण असा प्रश्न सुज्ञ नागरीकांन मध्ये उपस्थित होत आहे.त्यांनतर पांढरी वस्तीतील उपस्थित महिलांनी ग्रामसेवक मजीत तडवी कशा प्रकारे नागरिकांकडून पैसे घेतात, त्याच्या विरुद्ध कुणी तक्रार दिली तर ते कशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करतात , कुणी त्याच्या चुकीच्या कार्यपद्धती बद्दल प्रश्न निर्माण केलेत तर ते कसे परिवारासह समोरच्याना मारहाण करून दडपशाही करतात असे सांगत असताना. ग्रामसेवक मजीत तडवी,अजित तडवी,राजू तडवी,अरमान तडवी,रहीमत तडवी,नजमा तडवी हे सर्व पत्रकार व मुलाखत देणार्याच्या अंगावर धावून येत लाठ्या काठ्यांनी मारू लागले यात अशोक तायडे यांच्या डाव्या हाताला इजा झाली तर,कॅमेरामेन अमित तडवी यांच्या हातातील कॅमेरा ची तोड फोड करीत मेमरीकार्ड काढत त्यांना ही मारहाण केली तसेच यासिन तडवी व इब्राहिम तडवी यांना ही मारहाण करून गंभीर जखमी केले. सद्या त्याच्यावर जळगांव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून अशोक तायडे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशन ला ग्रामसेवक मजीत तडवी व त्यांच्या सोबत असलेल अजित तडवी,राजू तडवी,अरमान तडवी,रहीमत तडवी,नजमा तडवी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक आय.पी.एस. आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोलपकर हे करीत आहेत. द जर्नलिस्ट असोसिएशन नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य जळगाव जिंल्हा अध्यक्ष मा. सतिष सोनवणे यांनी भ्रमणध्वनी द्वारे घडलेल्या प्रकाराची माहीती द जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश उपध्यक्ष मा. लुनेश्वर भालेराव यांना कळवली आणि पुढील सुत्र जळगाव जिंल्हा पोलीस मुख्यालय प्रविण मुंडे यांच्या सोबत चर्चा करुन घटनेची माहीती दिली, मुंडे साहेबांनी यावल पोलीस स्टेशन ला तात्कालीन फोन करुन आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे